वाहतूक स्वाध्याय इयत्ता पाचवी
प्रश्न १) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) वाहतुकीच्या सोयीचा तुम्हांला झालेला फायदा, यावर पाच वाक्ये लिहा.
उत्तर:- वाहतुकीच्या सोईमुळे झालेले फायदे खालील प्रमाणे आहेत.
- वाहतुकीच्या सोयीमुळे कोणतीही वस्तू मला माझ्या गावात किंवा जवळच्या शहरात मिळू लागली.
- मला वाहतुकीच्या सोयीमुळे शहरातील शाळेला जाणे शक्य झाले आहे.
- घरासाठी लागणारे साहित्य लवकर उपलब्ध होऊ लागले.
- शेतात तयार होणारा माल विक्रीसाठी बाहेर घेऊन जाणे सोपे झाले.
- पर्यटन विकास झाला.
२) वाहतुकीच्या सोईमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा.
उत्तर: वाहतुकीच्या सोईमुळे परिसरात पुढील सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
- शहरात शिक्षणासाठी जाता आले.
- व्यापाराला चालना मिळाली.
- शेतीमालाला निरनिराळ्या बाजारपेठा निर्माण झाल्या.पर्यटन स्थळे विकसित झाली.
- पर्यटन स्थळा जवळील लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
- आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध झाल्या.
३) आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा.
उत्तर: परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
- वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी शक्य असेल त्या ठिकाणी पायी चालत जावे.
- जवळच्या प्रवासात कारचा उपयोग न करता सायकल, मोटरसायकल अथवा पायी जाण्याला प्राधान्य द्यावे.
- शक्य असेल तिथे खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.
- रस्त्यावर प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
4) तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोध. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा?
उत्तर:- डोंगर व जंगलाचा भाग असलेला आमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषित असलेला भाग आहे.
या भागाचे प्रदूषण कमी असण्यामागची कारणे खालील प्रमाणे आहेत.
डोंगर व जंगलाचा भाग असणाऱ्या भागांमध्ये लोकवस्तीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी प्रदूषण करणारे घटकही कमी असतात.
या भागामध्ये वाहनांची वर्दळ कमी असते. हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण झाडांमुळे चांगले असते.
मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असल्यामुळे येथील हवेत कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण कमी असते.
५) CNG व LPG ची विस्तारित रूपे लिहा.
उत्तर: CNG व LPG ची विस्तारित रूपे :
CNG: Compressed Natural Gas.
LPG: Liquefied Pertolium Gas.
0 टिप्पण्या