Swakiy shatruncha bandobast swadhay iyatta chouthi

 स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त

इयत्ता - चौथी.




प्र १) चुकीची जोडी ओळखा.

१) फलटण - निंबाळकर

२) जावळी - मोरे

३) सुपे - जाधव

 चुकीची जोडी

 सुपे - जाधव

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) जावळीच्या मोर्‍यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता ?

जावळीच्या मोर्‍यांना आदिलशाहाने चंद्रराव हा किताब दिला होता.

२) जावळीचा विजय फार महत्वाचा का होता ?

जावळीचा विजय फार महत्वाचा होता कारण, या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला.

प्र ३) दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) जावळीच्या मोर्‍यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?

जावळीचे जंगल अत्यंत दाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही नाही तेथे शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इ. श्वापदे संचार करत. मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जाळीच होती. त्यामुळे जावळीच्या मोर्‍यांच्या वाटेला कोणी जात नसे.

२) शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले?

शिवरायांनी यशवंतराव मोरे याला पत्र धाडले की, ' तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.'


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या