शिवरायांचे शिक्षण
इयत्ता - चौथी.
प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
१) शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते.
( संस्कृतचे, कन्नडचे, तमीळचे )
२) मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात.
( शेतकरी, सैनिक, मावळे )
प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कोणी व कोठे केली ?
शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक शहाजीराजे यांनी बंगळूरच्या दरबारात केली.
२) शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ?
शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे, इ. विद्या शिकवण्यास प्रारंभ केला.
३) दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट का दिली ?
शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी, म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याची सूट दिली.
प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
१) पुण्याचे रूप कसे पालटले ?
जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावातील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्यात येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
२) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ?
उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इ. अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या.
३) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?
जिजाबाईंनी निश्चय केला होता की, त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील.
0 टिप्पण्या