Santanchi kamgiri swadhay iyatta chouthi

संतांची कामगिरी


इयत्ता - चौथी.परिसर अभ्यास भाग -२



प्र १) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते.

२) ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.

३) संत तुकारामांनी आपल्या वटणीची कर्ज खाती इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.

४) समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते? 

श्रीचक्रधर स्वामींना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते.

२) संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला?

धर्म रक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार संत नामदेवांनी लोकांच्या मनात निर्माण केला.

३) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला?

संत एकनाथांनी कोणताही उच्चनीच भेदभाव मानू नका असा उपदेश केला.

४) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला?

समर्थ रामदासांनी, ' सामर्थ्य आहे चळवळीचे,जो जो करील तयाचे ' , हा संदेश दिला.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले?

ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले. पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले.

२) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ?

संत तुकारामांनी लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत - 

'जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले |

 तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा | 

हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या