Maratha sardar bhosalyanche kartbgar gharane swadhay iyatta chouthi

 मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे

इयत्ता - चौथी.परिसर अभ्यास भाग - २



प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.

( मोरे, घोरपडे, भोसले )

२) बाबाजी राजे भोसले यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.

( विठोजी, शहाजी, शरीफजी )

३) निजामशाहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता.

( मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी )

प्र २) नातेसंबंध लिहा.

१) मालोजी राजे - विठोजी राजे - भाऊ,भाऊ

२) शहाजीराजे  - लखुजीराव जाधव - जावई,सासरे

३) शहाजीराजे  - शरीफजी  - भाऊ,भाऊ

४) बाबाजी राजे - विठोजी राजे - पिता,पुत्र

प्र ३) योग्य जोड्या लावा.

१) सिंदखेडचे -  जाधव

२) फलटणचे -   निंबाळकर

३) जावळीचे -   मोरे

४) मुधोळचे  -    घोरपडे

प्र ४) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?

घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.

२) निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली ?

निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्यांची जहागीर दिली.

३) निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले ?

निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. 

४) आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला?

आदिलशाहाने शहाजीराजांना ' सरलष्कर ' हा किताब दिला.

५) शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले ?

निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले. म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या