Ek apurv sohala swadhay iyatta chouthi

 एक अपूर्व सोहळा

इयत्ता - चौथी.



प्र १) रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

१) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली.

( सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची )

२) शिवरायांचा राज्याभिषेक सन १६७४ मध्ये झाला.

( १६७४,१६७५,१६४७ )

प्र २) प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते ?

सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते.

२) शिवरायांनी राज्याभिषेकपासून कोणता शक सुरू केला ?

शिवरायांनी राज्याभिषेकपासून राज्याभिषेक हा शक सुरू केला.

प्र ३) दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

१) शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले ?

स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी. म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, शिवरायांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले.

२) शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली ?

रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली.

३) मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले ?

राज्याभिषेक झाल्यानंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले. मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टांचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न साकार झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या