आपले समुहजीवन
इयत्ता - तिसरी.परिसर अभ्यास.
प्र १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) घरात आपण कोणाबरोबर राहतो ?
घरात आपण आई-वडिलांबरोबर राहतो.
२) आपल्याला सुरक्षित केव्हा वाटते ?
समूहातील सर्वांच्या सोबतीमुळे आपल्याला सुरक्षित वाटते.
३) आपण नियमांचे पालन का केले पाहिजे ?
आपल्या समूहजीवनातील व्यवहार नीट होण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे.
प्र २) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) माणसांना समूहात राहायला आवडते.
२) समूहात आपल्याला सोबत मिळते.
३) आपले समूहजीवन असे परस्परावलंबी असते.
प्र ३) योग्य जोड्या लावा.
१) एकमेकांना मदत करणे - म्हणजे सहकार्य.
२) समूहजीवन नियमित चालण्यासाठी - नियमांची गरज असते.
३) खेळाचे नियम सर्वांसाठी - सारखेच असतात.
-
0 टिप्पण्या