Swayampak gharat jauya swadhay iyatta tisari

 स्वयंपाक घरात जाऊया...

इयत्ता - तिसरी.परिसर अभ्यास.



प्र १) काय करावे बरे?

१) स्वयंपाक घरात कोळशांची शेगडी वापरल्याने भिंती काळया पडल्या आहेत.

स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करावा. स्वयंपाक घराला खिडक्या लावाव्यात.

प्र २) जरा डोके चालवा.

१) पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात?

१) ढोकळा - वाफवणे.

२) आमटी - उकळणे.

३) करंजी - तळणे.

४) थालीपीठ - भाजणे.

५) बासुंदी - उकळणे.

६) रस्सा - उकळणे.

२) दुधापासून तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची यादी तयार करा.

 दही,ताक, लोणी, तूप,बासुंदी, पनीर, बर्फी, पेढा,लस्सी, आईसक्रीम, मिल्कशेक, श्रीखंड, गुलाबजाम इ. पदार्थ दुधापासून तयार होतात.

३) हरभरा वापरून कोण कोणते अन्नपदार्थ बनवतात?

हरभरा वापरून फुटाणे, उसळ, मिसळ, पुरणपोळी बनवतात. हरभऱ्याचे पीठ म्हणजेच बेसनपासून शेव, भजी, वडे, फरसाण, ढोकळा, पिठले, थालीपीठ, लाडू इ. पदार्थ बनवतात.

४) भाजी मंडईतून आणलेल्या काही भाज्या आपण न शिजवता खातो अशा भाज्यांची यादी करा.

काकडी, कोथिंबीर, गाजर, मुळा, मेथी, कोबी, टोमॅटो, कांदा कांद्याची पात इ. भाज्या मंडईतून आणल्यानंतर आपण न शिजवता खातो.

प्र ३) थोडक्यात उत्तरे द्या.

१) अन्नपदार्थ बनवताना उष्णता दिल्याने कोणते फायदे होतात? 

अन्नपदार्थ बनवताना उष्णता दिल्याने पदार्थ पचायला हलके होतात. तसेच ते अधिक खमंग व रुचकर होतात.

२) सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते?

सरपण वापरल्याने धूर होतो. तो हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. तसेच सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात. त्यामुळे परिसराची हानी होते.

३) स्वयंपाकासाठी गॅस वापरायचे फायदे कोणते?

स्वयंपाकासाठी गॅस वापरल्याने गॅसचा धूर होत नाही. तो पटकन पेटतो. तसेच स्वयंपाक करायला कमी वेळ लागतो. वृक्ष तोड थांबते.

प्र ४) माहिती मिळवा.

१) दुधापासून खवा कसा तयार करतात त्याची माहिती घ्या ती लिहून काढा.

एका कढईमध्ये दूध घ्या. कढईला उष्णता द्या. दूध करपू नये म्हणून सतत ढवळत रहा. दूध घट्ट होईपर्यंत त्याला आटवा. घट्ट झाल्यानंतर थंड करा. थोड्या वेळानंतर खवा तयार होतो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या