Sheras savvasher swadhay iyatta tisari


शेरास सव्वाशेर स्वाध्याय 

इयत्ता  -तिसरी 




 प्र १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) नाना काका आनंदाने का डोलत होते?

वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून नाना काका आनंदाने डोलत होते.

आ) सर्वच उंदीर पिंपळापाशी का धावत आले?

तळलेल्या भाज्यांच्या खमंग वासाने सर्वच उंदीर पिंपळापाशी धावत आले.

इ) झाडाच्या आडोशाला कोण लपून बसले होते?

झाडाच्या आडोशाला नाना काका लपून बसले होते.

प्र २. तर काय झाले असते?

अ) नाना काकांनी उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला असता तर....

उंदीर पिंजऱ्यात अडकले असते.

आ) नाना काकांच्या शेतात साप असते तर...

सापांनी उंदीर खाल्ले असते.

इ) नाना काकांच्या शेतात उंदीर नसते तर.... 

शेताची नासाडी झाली नसती.

ई) नाना काकांच्या शेतात मांजर असते तर.... 

मांजरांनी उंदीर खाल्ले असते.

प्र ३. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा व लिहा.

अ) अधीर होणे.

बाबांनी  मला नवीन कपडे आणले ते पाहण्यासाठी मी अधीर झालो.

आ) फस्त करणे.

आईने केलेला केक मी फस्त केला.

इ) सामसूम होणे.

अंधार पडताच माझे गाव सामसूम होते.

ई) कूच करणे.

लढाईसाठी सैनिकांनी कूच केले.

उ) कपाळावर हात मारणे.

चतुर उंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला.

ऊ) युक्ती सफल होणे.

आईसोबत गावाला जाण्याची माझी युक्ती सफल झाली.

प्र ४. खालील शब्दांच्या सुरुवातीला ' अ ' लावून नवीन शब्द तयार करा.

अ) धीर - अधीर.

आ) शक्य - अशक्य.

इ) स्वस्थ - अस्वस्थ.

ई) प्रकाशित - अप्रकाशित.

प्र ५ .' शेरास सव्वाशेर ' यासारख्या शब्दसमुहांना म्हणी म्हणतात. तुम्ही ऐकलेल्या, वाचलेल्या अशा म्हणी सांगा.

१) चोरावर मोर.

२) हाजीर तो वजीर .

३) चोर तो चोर वर शिरजोर .

 ४) चोराच्या मनात चांदणे.

५) भीक नको पण कुत्रा आवर.

६) करावे तसे भरावे.

७) गरज सरो वैद्य मरो.

प्र ६. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

अ) नासाडी - साडी , नाडी.

आ) कपाळावर - वर,पार, कर,कळा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या