Ramai bhimrao ambedkar swadhay iyatta tisari

रमाई भीमराव आंबेडकर 

इयत्ता - तिसरी 


 प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) रमाईना कोणी लिहायला वाचायला शिकवले?

रमाईना लिहायला वाचायला बाबासाहेबांनी शिकवले.

आ)  डॉ. आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते?

डॉ. आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते.

इ) डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला?

 डॉ.   बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील लोकांना मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक लढा उभारला.

ई) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो.

उ) बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढली? 

बाबासाहेबांनी कार्यकारणी सभेची स्थापना करून पद दलितांच्या स्वावलंबन स्वाभिमान नि आत्मोद्धारासाठी वसतिगृहाची स्थापना केली.

ऊ) वसतिगृहातील सर्व मुले का भारावून गेली?

रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने सर्व मुले भारावून गेली.

प्र २. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात?

भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते.त्यांनी मसुदा समितीत घटनेचा मसुदा तयार खूपच परिश्रम घेतले, म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात.

आ) रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले?

 वसतिगृहात मुलांना खायला एकही दाणा  नव्हता. दुकानदाराचे वाणसामानाचे बिल थकले होते त्यावेळी क्षणाचाही वेळ न दवडता रमाईंनी हातातल्या सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या. त्या मोडून त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा येऊ नये, म्हणून त्यांनी पुढच्याही काही दिवसांची बेगमी होईल एवढे अन्नधान्य भरून ठेवले.

प्र ३.  कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा.

(वणंद गाव, आई व बहुजनांच्या, कारुण्याची, गरिबीची)

अ) रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील व वणंद गाव येथे झाला.

आ) रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती.

 इ) रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते.

ई) रमाई दीन दलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या.

प्र ४. खालील वाक्यप्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा.

अ) खंत न बाळगणे.

खूप दुःखे वाट्याला आली, तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही.

आ)  हुरळून जाणे.

प्रसंगी एखादी सुख वाट्याला आले, तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत.

इ) न डगमगणे.

त्यांच्यासमोर संकटांचे डोंगर उभे होते, तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत.

ई) भारावून जाणे.

रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली.

प्र ५. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.

अ) अन्याय × न्याय .

आ) अपमान × मान.

इ)  दुर्लक्ष ×  लक्ष.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या