Prakashatale tare swadhyay tisari




 प्रकाशातले तारे तुम्ही

स्वाध्याय इयत्ता 3 री 

प्र. १.तुमच्या शब्दात सांगा.
अ ) आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय?
आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप खूप आनंद होणे.

आ) तुम्हाला कशाची चिंता वाटते? त्यावेळी तुम्ही काय करता?
आम्हाला अभ्यासाची चिंता वाटते. तेव्हा आम्ही अभ्यास पूर्ण करतो.

प्र.२. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) मुलांना कोण बोलवत आहे?
मुलांना फुलराणी बोलवत आहे.

आ) कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे?
कवीने मुलांना आनंदाच्या शिखरावरती बसायला सांगितले आहे.

इ) मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा, असे कवीला वाटते?
मुलांच्या मनावर भारत भूमीच्या आदर्शांचा ठसा असावा, असे कवीला वाटते.

ई) मुलांनी कशाची चिंता करू नये, असे कवीला वाटते?
मुलांनी उद्याची चिंता करू नये, असे कवीला वाटते.

उ) मुलांना कोण खुणवत आहे?
मुलांना सूर्य खुणवत आहे.

प्र. खालील व्यक्तीवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खुश होता हे प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा.
अ) आई
१) आई माझ्यावर रागवते, तेव्हा मी रुसतो.
२) आई माझ्या आवडीचा पदार्थ करते, तेव्हा मी खुश होतो.

आ) बाबा
१) बाबा माझ्यावर ओरडतात ,तेव्हा मी रुसतो.
२) बाबांनी माझ्यासाठी नवीन कपडे आणतात, तेव्हा मी खुश होतो.

इ) आजोबा 
१)आजोबा मला शेतात घेऊन जात नाहीत , तेव्हा मी  
रूसतो.
२)आजोबा मला खाऊ देतात ,तेव्हा मी खुश होतो.

ई) आजी
१) आजी मला दुकानावर घेऊन नाही गेली तर ,मी रुसतो.
२)आजी माझ्यासाठी खाऊ आणते, तेव्हा मी खुश होतो.

उ) मित्र 
१) मित्रासोबत खेळताना मी खुश होतो.
२) मित्रासोबत भांडण झाल्यावर  मी त्याच्यावर रुसतो.

 ऊ) शिक्षक 
१)शिक्षकांनी मला शाबासकी दिली तेव्हा मी खुश होतो.
२) शिक्षक माझ्यावर रागवल्यावर मी रुसतो.

ए) भाऊ
१) दादाने खाऊ दिल्यावर मी खुश होतो.
२) दादाने मला खेळायला घेतले नाही तेव्हा मी रुसतो.

ऐ) पाळीव प्राणी
१) माझ्या कुत्र्याने मला थँक्यू दिल्यावर मी खुश होतो.
२) माझा कुत्रा माझ्यावर भुंकला मी रुसतो.

प्र ४. खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते?
अ) बाबा बाहेरगावी गेले.
मला बाबांची खुप आठवण येते.

आ) ताईने सुंदर पेन दिले.
मी खूप खुश होतो.

इ) शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही.
शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही की भीती वाटते.

ई) रस्त्यात पाय घसरून पडलात.
मला वाईट वाटेल.

उ) तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला.
मला खूप आनंद होईल.

प्र ५. शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा.
उदा., फुलराणी - पाणी.
अ) बसा - हसा, ठसा.
आ) गुंता - चिंता.

प्र ६. खालील शब्दातील अक्षरांपासून शब्द तयार करा.
उदा.,भारत - भार, भात, तर.
अ) शिखरावर - वर, खरा, शिखर.
आ) अंधारावर - अंधार, धारा, धार, वर.
इ) आकाशात - कात, आत, आशा.
ई) पाऊसधारा - पाऊस, ऊस, पारा, धारा.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या