पाणी किती खोल?
इयत्ता तिसरी स्वाध्याय
१) एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) म्हशीला काय चावता येत नाही?
म्हशीला कडबा चावता येत नाही.
आ) पाणी कमी आहे ,असे कोणाचे म्हणणे आहे?
पाणी कमी आहे असे बैलकाकाचे म्हणणे आहे.
इ) झाडावरून कोण हाक मारत होते?
झाडावरून खारुताई हाक मारत होती.
ई) खारूताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली?
खारूताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण खारूताई ची मैत्रीण बुटकी आणि छोटी होती.
उ) नदी पार केल्यावर रेडकाने काय केले?
नदी पार केल्यावर रेडकू आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने निघाले.
मुग्धा लिहू लागली स्वाध्याय
२) कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा.
अ) "आता मी खरंच म्हातारी झालेय."
म्हैस रेडकाला म्हणाली, कारण म्हैशीला कडबा चावत नव्हता.
आ) " गुडघ्याइतकंच तर पाणी आहे.आरामात जाशील."
बैलकाका रेडकाला म्हणाले कारण बैलकाकाला नदीतील पाणी कमी वाटतं होते .
इ)" वाहून जाशील .मागे फिर."
खारूताई रेडकाला म्हणाली कारण खारूताई छोटी असल्यामुळे तिला नदीचे पाणी जास्त वाटतं होते .
ई) " मग तुला घाबरायच काय कारण ? "
म्हैस रेडकाला म्हणाली कारण रेडकू खारूताई पेक्षा मोठा व उंच आहे असे सागितले.
उ) " मला सहज जाता येईल.?"
रेडकू म्हणाले म्हैशीला कारण म्हैशी ने त्याला समजावले होते की खारूताईपेक्षा तो मोठा व उंच आहे.
एकदा गंमत झाली स्वाध्याय
३) जोड्या जुळवा.
१ )कडब्याची - पेंढी
२) लाकडाची - मोळी
३) मेथीची - जुडी
४) पुस्तकांचा - गठ्ठा
0 टिप्पण्या