Mugdha lihu lagali swadhyay iyatta tisari

मुग्धा लिहू लागली स्वाध्याय

इयत्ता - तिसरी




 प्र १.एका वाक्यात उत्तरे लिहा
.

अ) मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता?

मुग्धाच्या शाळेत बक्षीस वितरण समारंभ होता.

आ) समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते?

समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते.

इ) बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते?

  बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी दिली होती.

ई) मुग्धाला आपली चूक का कळू लागली?

एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर येऊ लागली त्यामुळे मुग्धाची चूक तिला कळू लागली.

एकदा गंमत झाली स्वाध्याय

प्र२. कोण ,कोणास म्हणाले?

१) " चित्रकला स्पर्धेत  पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय, पण ती जास्त बोलत नाही."

बाई मुग्धाच्या आई-बाबांना म्हणाल्या.

२) "मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता."

लेखक मुलांना म्हणाले.

३) " हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय."

लेखकाचे काका लेखकाला म्हणाले.

ई)" आणि मी एक साहित्यिक झालो."

लेखक मुलांना म्हणाले.

प्र ३. कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्ये लिहा.

( संकल्प ,अबोल, परिवर्तन ,मुग्ध, मनाशी, गमती जमती)

अ) पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या.

आ) बोलण्यानं लिहिण्यानं, वाचल्यानं, माझ्यात परिवर्तन घडत गेलं .

इ) त्या पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्ध अगदी मुग्ध झाली.

ई) मुग्धाने मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला.

उ) मुग्धाची अबोल कळी फुलायला लागली.

प्र ४. खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा.

उदा. गमती जमती

अ) बारीक सारीक

आ) जिकडे तिकडे

इ) काटे कुटे 

ई) दगड धोंडे

उ) चढ उतार

ऊ) पाला पाचोळा

प्र ५. खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर/ शब्द लावून नवीन शब्द तयार करा.

उदा. बोल - अबोल.

( सु,गैर, अ )

अ) संवाद - सुसंवाद

आ) हजर - गैरहजर

इ) न्याय - अन्याय 

प्र ६. एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली, की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो.उदा.,संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात.आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. सु , अ, कु अक्षरे वापर.

अ) स्पष्ट - अस्पष्ट × सुस्पष्ट.

आ) प्रसिद्ध  - सुप्रसिद्ध × कुप्रसिद्ध.

इ) योग्य - अयोग्य × सुयोग्य.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या