माझी शाळा
इयत्ता - तिसरी.परिसर अभ्यास.
प्र १) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात ?
खो - खो, कबड्डी, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, लंगडी यासारखे खेळ शाळेमध्ये खेळायला मिळतात.
२) शाळेत कोणत्या सुविधा असतात?
शाळेत वाचनालय, मैदान, संगणक कक्ष, प्रयोगशाळा इ. सुविधा असतात.
३) वाद कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत ?
वाद शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजेत.
प्र २) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
१) शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणा ची सवय लागते.
२) वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत.
३) प्रत्येक मुला- मुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे.
प्र ३) योग्य वाक्यांपुढे ✓असे आणि अयोग्य वाक्यांपुढे ×असे चिन्ह करा.
१) पुस्तकांची पाने फाडू नयेत.
योग्य ✓
२) खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये.
अयोग्य ×
३) शाळा सर्वांसाठी असते.
योग्य ✓
0 टिप्पण्या