मायेची पाखर स्वाध्याय
इयत्ता - चौथी.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले?
वस्तीगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले.
२) वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणा प्रमाणे होती?
वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया पित्याच्या प्रेमाप्रमाणे आणि मातेच्या मायेप्रमाणे होती.
३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले?
अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले.
४) कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या?
कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या.
प्र २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.
१) संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते.
२) स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली.
३) त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती.
४) "अण्णा, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात."
प्र ३) कोण, कोणाला म्हणाले?
१) "आता इथंच मुक्काम करा ! "
अण्णा पाहुण्यांना म्हणाले.
२) "जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू !"
अण्णा एका मुलाला म्हणाले.
३) "आपणास उदंड आयुष्य मिळो !"
पाहुणे अण्णांना म्हणाले.
प्र ४) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) लेखक उपाशी आहेत, हे समजल्यावर अण्णांनी काय केले?
लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला स्वयंपाक घरात पाठवले आणि तिथून जेवण आणायला सांगितले.
२) मध्यरात्री नंतर कोणता प्रसंग घडला?
मध्यरात्री नंतर अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हातात घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिले, की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगत उचलले. स्वतःच्या बिछान्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्यांच्या अंगावर घातली. त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले. त्या उबेत तो मुलगा गाढ झोपी गेला.
३) सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले?
"अण्णा , आपण खरे खरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे, तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो !"
प्र ५) वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
१) टाळाटाळ करणे - एखादी गोष्ट करावयाचे टाळणे.
२) पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे.
३) डोळा लागणे - झोप लागणे.
४) झटत राहणे - सतत प्रयत्न करणे.
प्र ६) लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते, म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
अ) भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते.
अजगरासारखे पडून होते म्हणजे अजगर खाल्ल्यानंतर सुस्त पडते,म्हणून भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते.
आ) दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही, म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात.
मांजरीच्या पायाचा म्हणजे मांजरीच्या पायाला गादी सारखा भाग असतो त्यामुळे मांजरीच्या पायांचा आवाज येत नाही. तसेच दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही. म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात.
प्र ७) सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा.
१) सकाळची वेळ होती.
पाखरे किलबिलाट करत होती.
सकाळचे प्रसन्न वातावरण होते.
आई सडा- रांगोळी काढत होती.
२) बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली.
अळीचा रंग हिरवा होता.
अळी पानावरून हळूहळू चालत होती.
अळीने पाने कुरतडली होती.
0 टिप्पण्या