Mala shikaychaya swadhay iyatta chouthi

मला शिकायचंय

इयत्ता - चौथी.



प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) स्नेहा का रडत होती?

स्नेहाच्या बाबा तिचे नाव पाचवीत टाकत नव्हते. त्यामुळे स्नेहा रडत होती.

२) सरपंचांनी बबली ला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता?

सरपंचांनी बबली ला पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता.

३) मुख्याध्यापक आणि सरपंच सखाराम च्या घरी का गेले?

स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं, म्हणून सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी गेले.

४) स्नेहाला अतिशय आनंद का झाला?
स्नेहाचे बाबांनी तिच्या पुढील शिक्षणासाठी परवानगी दिली तेव्हा स्नेहाला अतिशय आनंद झाला.

प्र २) तीन चार वाक्यात उत्तरे लिहा.
१) मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले?

मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले, सखा भाऊ तुमची लेक हुशार आहे. तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे. तिला पुढे शिकवा. स्वावलंबी बनवू द्या.

२) सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले?
सरपंच समजूतिच्या स्वरात सखारामला म्हणाले, अरे सखा तुझी पोरगी माझ्या पोरी एवढीच; तिच्या वर्गामध्ये शिकते तिला पण पाचवीत घाल. दोघीही आडगावला शाळेला जातील.आडगाव येथून अर्धा तासाच्या अंतरावर आहे.

३) स्नेहाची आई चिंतेत का पडली?
संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर आईने पाहिले, स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती. रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते. त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली.

४) सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला?
अपुरे शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करेन रक्ताचे पाणी करीन आणि स्नेहाला शिकवेन. सखारामने शेवटी स्नेहाला पाचवीत घालण्याचा निर्णय घेतला.

प्र ३) खालील शब्दसमूहांचा / वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

१) चिंतेत पडणे - काळजीत पडणे.
स्नेहाचे डोळे रडून सुजले होते तेव्हा आई चिंतेत पडली.

२) गहिवरून येणे - मन दाटून येणे.

सैनिक मुलगा घरी आल्यावर आईला गहिवरून आले.

३) डोळे पाणावणे - डोळ्यात अश्रू दाटणे.
स्नेहा रडायला लागली तेव्हा आईचे डोळे पाणावले.

४) अचंबा वाटणे  - आश्चर्य वाटणे.
सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटले.

५) पोटतिडकीने बोलणे - मनापासून कळकळीने बोलणे.
मुख्याध्यापक सखारामला मुलीच्या शिक्षणासाठी पोट तिडकीने बोलू लागले.

६) रक्ताचे पाणी करणे  - अतिशय कष्ट करणे.
आई-वडिलांनी  मुग्धाला डॉक्टर होण्यासाठी रक्ताचे पाणी केले.

प्र ४) खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत. पाठातील संवादाची हीच वाक्ये तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या - त्या वाक्यासमोर लिहा.

पाठातील संवाद
१) ओ माय, माले पुढे शिकानं शे....
ए आई, मला पुढे शिकायच आहे.

२) स्नेहा, तुले चवथीलोंग शिकाडं.…. आते आणखीन पुढे शिकीसन काय करशीन तू ?
स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकिवल. आणखीन पुढे शिकून काय करशील तू ?

३) अरे सखा, तुन्ही पोरगी एवढीच मन्ही बबली तिनाच वर्गामधनी.
अरे सखा तुझ्या पोरगी एवढीच माझी बबली तिच्याच वर्गांमधली.
४) आपुरं शिक्शन नको. दिनरात कष्ट करसू, रगतनं पाणी करसू,पन मन्ही आंडेरले शिकाडसू.
अपूर्ण शिक्षण नको. दिवस रात्र कष्ट करेन, रक्ताचे पाणी करेन, पण माझ्या मुलीला शिकवेन.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या