Madhmashine keli kamal swadhay iyatta tisari

मधमाशीने केली कमाल

इयत्ता - तिसरी


 प्र १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते?

पिवळीधमक, टपोरी व टवटवीत हे सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द आहेत.

आ) मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला?

मुंगीने शेतकऱ्याला यंदा फुलांचा धंदा करणार का? असा प्रश्न विचारला.

इ) मुंगीला फूल का आवडले?

सूर्यफूल पिवळेधमक , टपोरे व टवटवीत होते म्हणून मुंगीला आवडले.

ई) चिमणी खेळायला का निघून गेली?

बिया सोलता सोलता चिमणीला कंटाळा आला होता म्हणून चिमणी खेळायला गेली.

प्र २.  दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा.

अ) झाडावर कोणकोण राहत होते?

झाडावर मधमाशी, कोकिळा, चिमणी, कावळा,खारूताई राहत होते.

आ) मुंगीने कोणाकोणाला बिया दिल्या?

मुंगीने काही बिया कोकिळेला व  खारुताईला ,काही कावळ्याला व मधमाशीला व काही बिया स्वतः घेतल्या.

प्र ३. कोणी केले ते लिहा.

अ) बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या.

कोकिळेने बिया दुसऱ्याच्या घरात ठेवल्या.

आ) बिया सोलल्या.

बिया चिमणीने सोलल्या.

इ) सगळ्या बिया खाल्ल्या.

खारुताईने सगळ्या बिया खाल्ल्या.

ई) बिया टाकून दिल्या.

कावळ्याने बिया टाकून दिल्या.

उ) बिया रुजायला घातल्या.

मधमाशीने बिया रुजायला घातल्या.

प्र ४. कशासाठी ते लिहा.

अ) मधमाशी सर्वांना बोलवत होती.

खड्डा करून त्यात बिया रुजत घालण्यासाठी मधमाशी सर्वांना बोलवत होती.

आ) मुंगीने बिया जपून ठेवल्या.

पुढच्या वर्षी खाण्यासाठी मुंगीने बिया जपून ठेवल्या.

इ) खारुताई शेंड्यावर गेली.

बिया लपवून ठेवण्यासाठी खारुताई शेंड्यावर गेली.

ई) शेतकरी बियातून तेल गाळतो.

 सर्वांसाठी शेतकरी बियातून तेल गाळतो.

प्र ५. कोण म्हणाले?

अ) फुले तोडतो, बिया वाळवतो.

असे शेतकरी म्हणाला.

आ) सगळ्या बिया जातील वाया.

असे कावळा म्हणाला.

इ) कशासाठी ?  कशासाठी ?

असे कावळा म्हणाला.

ई) तरच मिळेल पोटाला घास.

असे मधमाशी म्हणाली.

प्र ६. विविध तेलबियांची नावे लिहा व संग्रह करा.

१) शेंगदाणे

२) सूर्यफूल 

३) तीळ

४) करडई

५) राई 

७) सोयाबीन






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या