होय, मीसुद्धा !
इयत्ता - चौथी.
आईने मोहनला दुकानातून डाळ, तांदूळ व साखर आणायला सांगितले.
२) मोहनने आकडेमोड का केली?
आईला पैशाचा हिशोब द्यायचा होता म्हणून मोहनने आकडेमोड केली.
३) मोहनला किती रुपये जास्त आले होते?
मोहनला पन्नास रुपये जास्त आले होते.
प्र २) का, ते लिहा.
१) आईने मोहनला हाक मारली.
आईला दुकानातून काही वस्तू हव्या होत्या म्हणून आईने मोहनला हाक मारली.
२) मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला.
खेळत असताना मोहनला आईने कामासाठी हाक मारली म्हणून मोहन कपाळावर आठ्या घालत घरात आला.
३) मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली.
स्वाभिमानीपणा दाखवून आईने मैत्रिणीचा फ्रॉक घेतला म्हणून मोहनच्या आईला तिच्या आईने शाबासकी दिली.
४) दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली.
मोहनने जास्त आलेले पन्नास रुपये दुकानदाराला प्रामाणिकपणे परत केले म्हणून दुकानदाराने मोहनला शाबासकी दिली.
५) मोहनला खूप भरून आले?
आईप्रमाणेच आपणही स्वाभिमानी व प्रामाणिक असल्याचे मोहनने दाखवून दिले, त्यामुळे मोहनला भरून आले.
प्र ३) खालील वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थाच्या जोड्या लावा.
१) पोटात बाकबुक होणे - खूप घाबरणे.
२) जीव भांड्यात पडणे - दिलासा मिळणे.
३) ढसाढसा रडणे - खूप रडणे.
प्र ४) खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा.
१) आकडे मोड
२) आरडा ओरडा
३) हात पाय
४) कावरा बावरा
प्र ५) पाठात 'पायांत जोडे न घातलेला' - या शब्दसमूहाबद्दल 'अनवाणी' हा एक शब्द आलेला आहे. खालील शब्द वाचा. असे आणखी शब्द शोधून लिहा.
१) जन्म झालेले ठिकाण - जन्मस्थान
२) विमान चालवणारा - वैमानिक
३) कविता करणारी - कवयित्री
४) शोध लावणारा - संशोधक
५) देशाची सेवा करणारा - देशसेवक
प्र ६) वाक्यातील रिकाम्या जागी खालील शब्दसमूहांची योग्य रूपे वापरा.
( चेहरा कसनुसा करणे, नजर चुकवणे, अस्वस्थ होणे.)
कपबश्या कपाटात ठेवताना माझ्या हातून एक कप फुटला त्यामुळे मी अस्वस्थ झालो. चेहरा कसनुसा करून मी आईकडे गेलो. तिच्याशी नजर चुकवून बोलू लागलो.
प्र ७) 'दुकान' या शब्दाला 'दार' प्रत्यय लावून 'दुकानदार' असा शब्द पाठात आलेला आहे. असे आणखी शब्द शोधून लिहा.
१) हवालदार
२) रखवालदार
३) राखणदार
४) बहारदार
५) मजेदार
६) शिलेदार
0 टिप्पण्या