ज्ञानेंद्रिये
इयत्ता - तिसरी.परिसर अभ्यास.
प्र १) काय करावे बरे?
'आजोबांना जेवायला बोलव ',असे आईने सकीनाला सांगितले आहे ; पण सकीनाच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही. आईने जेवायला बोलावले आहे, हे सकीना आजोबांना कसे सांगेल?
सकीना आजोबांच्या जवळ जाईल. त्यांना स्पर्श करून त्यांचे लक्ष वेधून घेईल. नंतर त्यांना खानाखुणा करून जेवायला चला असे सांगेल.
प्र २) जरा डोके चालवा.
१) कालचे दही आज खराब झाले आहे, खाण्याजोगे राहिले नाही, हे तुम्हाला कसे समजते?
दह्याची चव बिघडते आणि आंबट, उग्र व कुबट वास येतो. ते पिवळसर दिसू लागते म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी जीभ, नाक आणि डोळे या तिन्हींमुळे दही खराब झाले आहे. ते खाण्याजोगे राहिलेले नाही हे लक्षात येते.
२) पुढे स्वयंपाक घरातील पदार्थांची नावे दिली आहेत. त्यांचा रंग कोणता असतो?
१) हळद - पिवळा
२) कोथिंबिरीची पाने - हिरवा
३) पिकलेली मिरची - लाल
४) मीठ - पांढरा
५) कच्चा टोमॅटो - हिरवा
प्र ३) पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते ते लिहा.
१) पेरू गोड आहे.
जीभ
२) बाहेर कोकीळ गात आहे.
कान
३) सूर्यफूल पिवळे आहे.
डोळे
४) उदबत्तीचा वास चांगला आहे.
नाक
५) औषध कडू आहे.
जीभ
६) टॉवेल खरखरीत आहे.
त्वचा
प्र ४) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) दाणे भाजताना काकूंनी दोन हातांचा उपयोग कसा केला आहे?
काकूंनी शेंगदाणे भाजताना डाव्या हाताने चिमटा पकडला आहे. चिमट्याने कढई धरली आहे. त्यांच्या उजव्या हातात उलथने आहे. उजव्या हातातील उलथण्याने कढईतले शेंगदाणे परतत आहेत.
२) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय?
आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारे अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिये होय. डोळे,नाक, कान,जीभ आणि त्वचा ही आपली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.
३) ज्ञानेंद्रियांची आपल्याला कोणती मदत होते?
ज्ञानेन्द्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते. डोळ्यांनी आपण पाहतो. नाकाने आपण वास घेतो. कानांनी आपण ऐकतो. जिभेमुळे आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात. आणि त्वचेमुळे आपल्याला स्पर्श ज्ञान होते.
४) हालचालींमध्ये ताळमेळ का असावा?
हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर, कामांत चुका आणि घोटाळे होतील. साध्या साध्या चुकांमुळे मोठे घोटाळे होऊ शकतात. चुका व घोटाळे टाळण्यासाठी हालचालींमध्ये तळमळ असावा.
प्र ५) गाळलेले शब्द भरा.
१) डोळ्यांमुळे वस्तू किती दूर आहे याचा अंदाज येतो.
२) आवाज कोणत्या दिशेने येतो ते कानांमुळे समजते.
३) हवा कुबट आहे हे वासावरून समजते.
४) वस्तू गरम आहे हे आपल्याला त्वचेमुळे समजते.
५) मिरची खाऊन जिभेची आग होते.
0 टिप्पण्या