Gungrahak raja swadhyay



 गुणग्राहक राजा

इयत्ता - चौथी.

प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) मुले कोणता खेळ खेळत होती?

मुले सुरपारंबीचा खेळ खेळत होती.

२) महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले?

महाराजांनी गजाननला जरीची टोपी बक्षीस दिले.

३) गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले?

गजाननने कागदावर बोरूने 'श्रीमंत सयाजीराव महाराज की जय ! ' असे लिहिले.

प्र २) गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा.

१) थोड्यावेळाने महाराज भानावर आले.

२) पोरं घोडागाडीतून घरी परतली.

३) "बघू तुझं हस्ताक्षर !"

प्र ३) कोण, कोणाला म्हणाले?

१) " पोरं चपळ आहेत. विद्याधिकाऱ्यास सांगून त्यांना वाड्यात बोलवा."

श्रीमंत सयाजीराव गायकवाड  महाराज मानकऱ्यास म्हणाले.

२) " झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खूश झाले." 

विद्याधिकारी  मुलांना म्हणाले.

३) " काय नाव बाळांनो तुमचं ?"

महाराज गजाननला म्हणाले.

४)" पोरगा गुणी आहे. त्याकडे लक्ष द्या. उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे."

महाराज विद्याधिकाऱ्यास म्हणाले.

प्र ४) थोडक्यात उत्तरे लिहा.

१) मुलांनी राणीसाहेबांना सुरपारंबीचा खेळ कसा दाखवला?

मुलांनी राणीसाहेबांसाठी राजवाड्यासमोर मोठ्या वडाच्या झाडावर सूरपारंबीचा खेळ सुरू केला.मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पायांखालून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननची झाडावर चढण्या - उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजानननं काळूला पकडलं. आता गजानननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागे वर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला. गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीने घामाघूम झाली. अशा तऱ्हेने मुलांनी राणीसाहेबांना सुरपारंबीचा खेळ दाखवला.

२) गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली?

गजानन च्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता.गजाननने अभ्यासात, चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धेत बक्षिसे मिळवली.   त्याने एकूणअठरा बक्षिसे मिळवली. सयाजीराव गायकवाड महाराजांनी गजाननला जरीची टोपी बक्षीस दिले. तसेच उद्याचे हे बडोद्याचे रत्न आहे. असा गौरव केला.

प्र ५) खालील वाक्यांमधील 'सूर' या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा.

१) काळूने सूर दूर फेकला.

येथे सूर याचा अर्थ दीड हात लांबीची काठी.

२) आज गाण्यांमध्ये खांसाहेबांचा सूर भन्नाट लागला होता.

येथे सूर याचा अर्थ आवाज किंवा स्वर.

३) 'एक, दोन, तीन' म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला.

येथे सुर याचा अर्थ उडी मारणे.

प्र ६) खालील वाक्यांमधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा.

१) कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला.

हार - पराभव 

हार - फुलांची माळ

२) सरपंच झाल्यापासून सरोजाला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो.

मान - आदर 

मान - स्वाभिमान

३)हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला.

तीर - बाण

तीर - काठ , किनारा

४) खळखळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला.

पाट - कालवा

पाट - बैठक



















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या