धाडसी हाली
इयत्ता - चौथी.
२) हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती?
हाली लाकडे गोळा करायला जंगलात गेली होती.
३) हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला?
हालीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला.
४) हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली?
हालीला दिल्लीला जाण्यासाठी तिचा मामा पांडू किरकिरे, गावचे लोक, शहापूरचे लोक, गावचे शिक्षक यांनी मदत केली.
५) हालीने कोणता संदेश दिला?
घाबरले नाही पाहिजे, लोकांना वाचवले पाहिजे.
प्र २) हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा.
हाली आणि तिची मोठी बहीण शकुंतला जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेली होती. तेव्हा पाठीमागून तिच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला. तिच्या पाठीचा लचका तोडला मांडी आणि पायाचा लचका काढला. हालीची बहीण जखमी झाली. तेव्हा हालीने वाघाला मोठी मोठी दगड मारली वाघाला दगड लागले आणि वाघ पळून गेला. हालीने बहिणीला पहिल्यांदा शहापूरच्या दवाखान्यात नेली. नंतर ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. अशा रीतीने हालीने तिच्या बहिणीचे प्राण वाचवले. त्यामुळे हालीला या धाडसाबद्दल नवी दिल्ली येथे मा. पंतप्रधानांच्या हस्ते सन 2013 मध्ये वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला.
प्र ३) हालीला 'वीर बापूराव गायधनी' हा शौर्य पुरस्कार का मिळाला?
नाशिकमधील बापू गायधनी यांनी भीषण आगीतून लहान मुलांना आणि जनावरांना वाचवले. त्यासाठी त्यांनी स्वतःचा प्राण गमावला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या या अतुलनीय शौर्याच्या स्मरणार्थ स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूर मुला-मुलींना 'बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' दिला जातो. हालीनेही आपल्या जीव धोक्यात घालून आपल्या बहिणीचे प्राण वाचवले होते. म्हणून हालीला 'वीर बापूराव गायधनी' राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला.
0 टिप्पण्या