चवदार तळ्याचे पाणी
इयत्ता - चौथी.
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली?
चवदार तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली.
२) चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्ती मागे कोणाची स्फूर्ती आहे?
चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तिमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्फूर्ती आहे.
३) चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले?
चवदार तळ्याच्या पाण्याने दीनदलितांना प्रेरित केले.
प्र २) थोडक्यात उत्तरे लिहा.
१) 'अन्यायासाठी लढुनी ' असे कवियित्री का म्हणते?
महाड येथील चवदार तळ्याचे पाणी दीनदलितांसाठी खुले नव्हते. दलितांना त्यावर जाण्यास बंदी होती. हा त्यांच्यावर अन्याय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणते.
२) आत्मभान कशामुळे जागे होते?
सामान्य माणसात ज्यावेळेस स्वत्वाची जाणीव जागी होते. मानव माणूस म्हणून ज्या वेळेस जगतो. तेव्हा माणसाला स्वतःचे मी पण कळते आणि आत्मभान जागे होते.
प्र ३) रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.
( नाकारायचे, स्वीकारायचे, लढायचे, प्रेरित करायचे, जागे करायचे)
१) दीनांना प्रेरित करायचे.
२) मानवतेला स्वीकारायचे.
३) अन्यायाविरुद्ध लढायचे.
४) परंपरेला नाकारायचे.
५) आत्मभान जागे करायचे.
प्र ४) जोड्या जुळवा.
१) भीमकाय - स्फूर्ती
२) मुक्यास - वाणी
३) दीनांना - प्रेरणा
४) अन्यायाविरोधी - लढा
५) परंपरेला - नकार
प्र ५) समानार्थी शब्द लिहा.
१) पाणी - जल , उदक
२) वाणी - भाषा,बोल,आवाज
३) शक्ती - ताकद, ऊर्जा
४) दीन - गरीब, दुबळा
प्र ६) खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा.
१) स्फूर्ती
सोहमला थोर माणसांची चरित्रे वाचून स्फूर्ती मिळते.
२) दीन
दीन दुबळ्यांना मदत करावी.
३) मानवता
घडलेल्या प्रसंगात मानवतेचे दर्शन घडते.
४) शक्ती
मनालीने पूर्ण शक्तीने ओझे उचलले.
५) दिन
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे.
प्र ७) 'ता' प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा.
उदा. मानव - मानवता
१) सुंदर - सुंदरता
२) मधुर - मधुरता
३) नादमय - नादमयता
0 टिप्पण्या