बोलणारी नदी
इयत्ता - चौथी
प्र १) एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) लीलाला कसली हौस होती?
लीलाला खोड्या काढण्याची भारी हौस होती.
२) लीलाला काय खायचे होते?
लीलाला बर्फाचा गोळा खायचा होते.
३) नदीबाई कोणा कोणापेक्षा मोठी होती?
ताई, आई, माई यांच्यापेक्षा नदीबाई मोठी होती.
४) आईने पेढ्यांचा डबा कोठे ठेवला होता?
आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता.
५) पेढा घेऊन लीला कोठे गेली ?
पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली.
प्र २) खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा.
१) तुम्हाला काय खावेसे वाटते?
आम्हाला पाणीपुरी खावेसे वाटते.
२) घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत, असे सांगतात?
आईस्क्रीम, पाणीपुरी ,शेवपुरी इ. अनेक पदार्थ खाऊ नयेत, असे घरातील मोठी माणसे सांगतात.
३) तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते?
आम्हाला कंटाळा आल्यावर झोपावे वाटते.
प्र ३) दोन अक्षरी शब्द - गळा, तीन अक्षरी शब्द - घोटाळा, चार अक्षरी शब्द- घळाघळा, यांसारखे शेवटी 'ळा' हे अक्षर येणारे प्रत्येकी चार शब्द लिहा.
१)दोन अक्षरी शब्द - मळा, काळा, निळा,गोळा
२)तीन अक्षरी शब्द - सावळा ,कावळा, कंटाळा, पिवळा
३)चार अक्षरी शब्द - खुळखुळा, कळवळा, घननिळा, चळवळा.
प्र ४) कोण, कोणाला म्हणाले?
१) "नको बुडवू शाळा."
ताई लीलाला म्हणाली.
२) "काय खाऊ आणलास?"
लीला भोला मामाला म्हणाली.
३) " तू बदामी पेढे नदीत फेकलेस?"
आई नीलाला म्हणाली.
४) "काय गं लीला नदी तुझ्याशी बोलते?"
माई लीलाला म्हणाली.
प्र५) खालील शब्दांचे अनेक वचन करा.
१) डबा - डबे
२) बैल - बैल
३) नदी - नद्या
४) डोळा - डोळे
५) दिवस - दिवस
६) पेढा - पेढे
0 टिप्पण्या