Bhandyanchya duniyet swadhyay iyatta satavi

भांड्यांच्या दुनियेत

इयत्ता - सातवी


 प्र १.खालील विधानांमागील  कारणांचा शोध घ्या व लिहा.

अ) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.

शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे  माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न  साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली.

आ) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवणाची पद्धत होती.

पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती कारण ताटे धुवायला वेळ लागत असे.

इ) आज घरोघरी मिक्सर वापरतात.

पाटावरवंटा व खलबत्ता याने वाटणे म्हणजे याला जास्त वेळ व मेहनत लागते मिक्सर मुळे कमी मेहनत वेळेची बचत होते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात .

ई) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

माती पासून विविध आकाराची भांडी बनवणे शक्य आहे मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात तसेच मातीच्या भांड्यातील पदार्थ ताजे राहतात म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

प्र २. खालील आकृती पूर्ण करा.

मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक.

दगड

लाकूड

चामडे

लोखंड

तांबे

प्र ३.' भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. ' या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

भूक ही मानवाची मूलभूत गरजा आहे ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो अन्य शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वीपासून भांड्यांची गरज वाटू लागली म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.

प्र ४. तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.

आमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे शक्य असल्यास आम्ही पुनर्वापर करतो. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवतो.

प्र ५. दोन - दोन उदाहरणे लिहा.

१) मातीची भांडी - रांजण, मडकी.

२) चामड्यापासून बनवलेली भांडी - चामडी बुधले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे.

) लाकडी भांडी -  काटवट, उखळी.

४) तांब्याची भांडी - हंडा, बंब.

५) चिनी मातीची भांडी - किटली, सुरई.

६) नॉनस्टिकची भांडी - तवा ,कढई.

७) काचेची भांडी - ग्लास ,कप.

प्र. यांना काय म्हणतात?

अ) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट - पत्रावळी

आ) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे - तस्त.

इ) दुधासाठीचे भांडे -    कासंडी किंवा  चरवी.

ई) ताकासाठीचे भांडे - कावळा.

) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे - घंगाळ 

प्र ८. कंसातील शब्द व शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा .

( अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगे सोयरे )

अ) संत तुकारामांनी वृक्षांना सगे सोयरे  संबोधून त्यांचा गौरव केला.

)   नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.

इ) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले.

ई) कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या