Apala aahar swadhyay iyatta tisari

आपला आहार 

इयत्ता - तिसरी विषय -परिसर अभ्यास.



प्र १) पुढील यादीतून कामांचे बैठे काम व अंग मेहनतीचे काम असे वर्गीकरण करा.

खो-खो खेळणे, तांदूळ निवडणे, सायकल चालवणे, पुस्तक वाचणे, झाडलोट करणे, डोंगर चढणे, चित्र काढणे, ट्रंका उचलणे, बागेतील गवत काढणे.

१) बैठे काम - तांदूळ निवडणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, झाडलोट करणे.
२) अंग मेहनतीचे काम - खो - खो खेळणे, सायकल चालवणे, डोंगर चढणे, ट्रंका उचलणे,बागेतील गवत काढणे.

प्र २) चूक की बरोबर सांगा.

१) घरी केलेला प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा. - बरोबर 

२) जाहिरातीतील पदार्थ आवर्जून खावेत. - चूक 

३) आकर्षक वेष्टणातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते.- चूक

४) सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात. - चूक

प्र ३) एका शब्दात उत्तरे द्या.

१) कोणत्या ऋतूत आमरस केला जातो?
उन्हाळा

२) ऊसाच्या रसाची गुऱ्हाळ कोणत्या ऋतूत चालू असतात?
उन्हाळा

३) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो?
  हिवाळा

४) उन्हातून खेळून आल्यावर खूप तहान लागली आहे. तुमच्यासमोर लिंबाचे सरबत आहे. बाजारातून आणलेली शीतपेयही आहे. यातले कोणते पेय घेऊन तहान भागवणे चांगले?

लिंबाचे सरबत 

आपली पाण्याची गरज स्वाध्याय 

प्र ४) विचार करून उत्तरे लिहा.

१) तीन वर्षाच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरीत भरते, म्हणून त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरेल का? कारण सांगा?

तीन वर्षाच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरीत भरते, पण त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरणार नाही कारण आई वयाने मोठी असते. ती भरपूर काम करत असते, त्यामुळे तिच्या शरीराला जास्त ऊर्जा लागते.

२) एक माणूस रोज पाच पोळ्या खातो. एखाद्या दिवशी तो तापाने फणफणला  असेल. त्या दिवशीही पाच पोळ्या खाईल का? कारण सांगा.

 रोज पाच पोळ्या खाणारा माणूस तापाने फणफणला असेल, तर त्या दिवशीही तो पाच पोळ्या खाणार नाही. कारण आजारी माणसाला कमी भूक लागते. त्यामुळे तो त्या दिवशी पाच पोळ्या खाणार नाही.

३) प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो. त्याची कोणकोणती कारणे असतील?

प्रत्येक व्यक्तीचा आहार वयोमानानुसार, शरीर रचनेनुसार, त्याच्या कामानुसार  वेगवेगळा असतो. 

४) आईला आजीसाठी भाकरी कुस्करून का ठेवावी लागते?

आजीचे वय झाल्यामुळे तिचे दात पडले आहेत. त्यामुळे आजीला भाकरी चावता येत नाही. म्हणून आईला आजीसाठी भाकरी कुस्करून ठेवावी लागते.

५) ताटात भाजी टाकू नको, असे आईने ताईला का सांगितले असेल?

ताईला भाजी आवडत नसेल, पण सर्व भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात म्हणून आईने ताईला ताटात भाजी टाकू नको असे सांगितले असेल.

प्र ५) माहिती मिळवा.

मूग, मटकी, वाल, चवळी यांना मोड आणण्याच्या कृतीची माहिती मिळवा. लिहून काढा.

मूग, मटकी, वाल, चवळी यांना मोड आणण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये टाकावीत. रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी एका स्वच्छ कपड्यांमध्ये मूग, मटकी, वाल, चवळी बांधून ठेवावेत. नंतर दहा बारा तासाने त्याला मोड येतात.

प्र ६) गाळलेले शब्द भरा.

१) अंग मेहनतीची कामे करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष त्यांना पुरेसे अन्न मिळायला हवे.

२) प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते.

३) जाहिरातीतील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो.


निवारा आपला आपला स्वाध्याय 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या