Abab kiti prakarche he prani swadhay iyatta tisari

 अबब ! किती प्रकारचे हे प्राणी 

इयत्ता - तिसरी परिसर अभ्यास.

Abab kiti prakarche he prani


प्र १) जरा डोके चालवा.

१) भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी?

भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे.

२) मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणत्या सारखेपणा आहे.

मासा आणि सरडा या दोघांमध्ये अंगावर खवले असतात. हा सारखेपणा आहे.

३) अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता?

झेब्रा या प्राण्याच्या अंगावर पट्टे असतात.

४) वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात?

वाळवंटात राहणारे लोक वाहतुकीसाठी उंट पाळतात.

५) मेंढ्या कशासाठी पाळतात?

मेंढ्यापासून दूध, मांस,लोकर मिळते म्हणून मेंढ्या पाळतात.

६) कोंबड्या कशासाठी पाळतात?

कोंबड्या पासून अंडी व मांस मिळते. म्हणून कोंबड्या पाळतात.

७) वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.

हरीण, चित्ता हे प्राणी वेगाने पळतात.

८) उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्षांची नावे लिहा.

गरुड, घार हे प्राणी उंच भराऱ्या घेतात.

९) अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते?

हरीण ,साप या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात.

१०)  आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? 

सिंहाला आयाळ असते.

प्र २) पुढील वाक्य पूर्ण करा.

१) सर्व कावळे काळे असतात. सर्व पोपट हिरवे असतात, पण गाईंचा रंग वेगवेगळा असतो.

गाई काळया, पांढऱ्या किंवा तांबड्या असतात.

प्र ३) पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

१) कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते?

शेळी, गाय ,म्हैस , मेंढी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते.

२) घरात उंदीर का नको असतात?

घरात उंदीर नको असतात कारण उंदीर घरातील अन्नधान्यांची नासाडी करतात.

३) माशांचा संचार कुठे असतो?

माशांचा संचार पाण्यात असतो.

४) अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? 

मोर,पोपट, घार, कोंबड्या सारख्या पक्ष्यांच्या अंगावर  पिसे असतात.

५) पक्ष्यांना किती पाय असतात?

पक्षांना दोन पाय असतात.

प्र ४) चूक की बरोबर ते सांगा.

१) बगळा पांढरा असतो. - बरोबर

२) पोपटाच्या अंगावर खवले असतात. - चूक

३) मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते. - चूक

४) पालीच्या अंगावर केस असतात. - चूक

५) कोंबडा खूप उंच उडत नाही. - बरोबर

प्र ५) जोड्या लावा.

१) सरडे - सरपटतात.

२) घार - आकाशात उंच भराऱ्या घेऊ शकते.

३) वटवाघूळ - उडू शकते पण पक्षी नाही.

४) फुलपाखरू - सहा पाय असतात.

५) मासे - पाण्यात राहतात.

प्र ६) पुढील प्राणी ओळखा.

१) घरात जळमटे करणारा - कोळी .

२) रंगीबेरंगी -  फुलपाखरू.

३) सोंड असलेला - हत्ती.

४) वेगाने धावणारा - चित्ता.

प्र ५) प्राण्यांना किती पाय असतात.

१) साप - पाय नसतात.

२) गरुड - दोन पाय असतात.

३) हरीण - चार पाय असतात.

४) पाल - चार पाय असतात.

५) माशी - सहा पाय असतात.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या