Aapali panyachi garaj swadhay iyatta tisari

 आपली पाण्याची गरज

इयत्ता - तिसरी. परिसर अभ्यास.





प्र १) थोडक्यात उत्तरे द्या. 

१) आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते?
आपल्या शरीरात अश्रू, लाळ, नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये पाणी असते.


२) आपण पाणी का पितो?
पाण्यामुळे रक्त पातळ राहते. पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट व्हायला मदत होते. नको असणारे पदार्थ लघवीवाटे शरीराबाहेर जातात. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपण पाणी पितो.


३) गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात?
गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात.


३) वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते?
काकडीच्या किसात, लिंबाच्या फोडीत आणि सगळ्याच भाज्या आणि फळातून रस काढता येतो.  यावरून वनस्पतींमध्ये पाणी असते हे समजते.


४) पुरेशा पाण्याअभावी शेती का करता येत नाही?
वनस्पतींना पाण्याची गरज असते. त्यांना पाणी मिळाले नाही, तर त्या जगणार नाही. म्हणून शेतकऱ्याला शेतातील पिकांना पाणी द्यावे लागते पुरेसे पाणी नसेल तर शेतकऱ्यांना शेती करता येत नाही.


५) मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते?
मोठ्या शहरात खूप लोक राहतात. तसेच तेथे कारखानेही असतात, त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो. म्हणून मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते.


६) जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते?
जंगलातील वनस्पतींना पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनस्पतींची मुळे खूप खोलवर पसरतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.


प्र २) रिकाम्या जागा भरा.
( डुंबत, पाळीव, महत्त्व, पातळ, मुरलेले, जंगली प्राणी )


१) पाण्यामुळे रक्त पातळ  राहते.


२) जनावरे पाण्यात डुंबत असतात.


३) लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात.


) जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते.


५) माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे.


६) जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.


 निवारा आपला आपला स्वाध्याय 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या