शिष्यवृत्ती परीक्षा 2022 कधी होणार?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत दरवर्षी इयत्ता पाचवी आणि आठवी करिता शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. शिष्यवृत्ती परीक्षा या वर्षी 20 जुलै 2022 रोजी होणार होती. मात्र या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा 2022 वेळापत्रक
सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी निर्माण होऊ शकतात. काही भागांमध्ये वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा परिषदेमार्फत परीक्षेच्या दिनांक मध्ये बदल केला आहे. आताही परीक्षा 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे होणार आहे.
यापूर्वी निर्गमित केलेले प्रवेश पत्र चालेल का?
परीक्षा परिषदेच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेश पत्र 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या