ekach shabdache bhinn arth asnare shabd | एकाच शब्दाचे दोन अर्थ


एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द




            मराठीमध्ये आपल्याला अनेक शब्दांचे भिन्न अर्थ पहावयास मिळतात. म्हणजेच एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ 1) क्रिकेटमध्ये मनोजच्या संघाची संघाला हार झाली. २)पाहुण्यांनी फोटोला हार घातला. या दोन वाक्यामध्ये हार हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आला आहे. पहिल्या वाक्यात हार शब्द पराभव या अर्थाने आला आहे, तर दुसऱ्या वाक्यात हाच शब्द फुलांची माळ या अर्थाने आहे. अशा प्रकारे भिन्न अर्थ असणारे काही शब्द या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.

1.    अभंग – न भंगलेला ,काव्यरचनेचा एक प्रकार

2.   अंतर – भेद, लांबी, दोन ठिकाणामधील अंतर

3.   अनंत – अमर्याद , परमेश्वर

4.   आस – इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

5.   ऋण – कर्ज, उपकार, वाजबाकीचे चिन्ह

6.   ओढा – मनाचा कल, पाण्याचा लहान प्रवाह

8.  अंग – शरीर, भाग ,बाजू

9.   अंबर – आकाश, वस्त्र

10.कळ – भांडणांचे कारण ,गुप्त किल्ली, वेदना

11. कर – हात , किरण ,सरकारी सारा

12. कर्ण – कान, त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू

13. काळ – वेळ , यम ,मृत्यू

14. गार - थंड, आकाशातून पडणारा लहान बर्फाचा तुकडा

15. घाट –दोन डोंगरातील रस्ता , नदीच्या पायऱ्या

16. चिरंजीव – मुलगा, दीर्घायुषी

17. जलद – ढग ,लवकर

19. जीवन – आयुष्य, पाणी

20. जोडा - जोडपे, चप्पल

21. डाव – कारस्थान ,कपट ,खेळी

22. तट – किनारा , कडा, किल्ल्याची भिंत

24. तीर – काठ ,बाण

25. दंड – शिक्षा , काठी ,बाहू

26. द्वविज – पक्षी ,ब्राह्मण

27. धड – मानेखालचा शरीराचा भाग , अखंड, स्पष्ट

28. धडा - पाठ , रिवाज

29. ध्यान – चिंतन ,समाधी 

30. धनी - मालक, श्रीमंत मनुष्य

31. नाद – छंद ,आवाज

32. नाव – होडी ,वस्तूचे नाव

33. पेय – पाणी , दूध

34. पर – परका , पंख

35. पक्ष – वादातील बाजू ,पंधरवडा, राजकीय संघटना

36.पत्र - झाडाचे पान ,चिठ्ठी

37.पार – पलीकडे ,वडाच्या भोवतालचा पार

38. पास - उत्तीर्ण ,परवाना

39. पात्र – भांडे ,योग्य

40.पूर – नगर ,पाण्याचा पूर

41.भाव – भक्ती , किंमत ,दर , भावना

42.भेट – नजराणा , दोन व्यक्ती एकत्र येणे

43.माया – ममता, संपत्ती, कडेने सोडलेली जागा

44.मान – मोठेपणा , शरीराचा एक अवयव

45.माळ – फुलांची माळ, ओसाड जागा

46. वर – आशीर्वाद ,वरची दिशा ,ज्याचे लग्न ठरले आहे असा पुरुष

47. वल्ली – वेल , स्वच्छंद माणूस

48.वाणी – बोली ,व्यापारी ,एक सरपटणारा किडा

49.वार - दिवस ,घाव

50.वात – वारा , विकार ,दिव्याची वात

51.वारी – पाणी ,यात्रा ,नियमित फेरी

52.वाली – रक्षण कर्ता ,एका वानराचे नाव

54.सुमन – फूल ,पवित्र मन, मुलीचे नाव

55.सूत – धागा , सारथी, मुलगा

56.हार – पराभव , फुलांची माळ 
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या