२६. मांजराची दहीहंडी
१) कोण कोणास म्हणाले?
अ) बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू,
- साळोबा बोकोबाला म्हणाला.
आ) आजी, आजी लवकर ये, मांजराची दहीहंडी पाहून घे.
- माधुरी आजीला म्हणाली
२) कोण ते लिहा.
अ) मांजरामध्ये सर्वात लहान असणारा- साळोबा
आ) मांजरामध्ये सर्वात हुशार असणारा- साळोबा
इ) आजीबाई आणि नात यांना आवडणारी- मांजरे
ई) मांजराची दहीहंडी पाहणारी- माधुरी
उ) घाबरून पळून गेलेली- मांजरे
३) का ते सांग.
अ) दहीहंडीत साळोबा मांजर सर्वात वर उभे राहिले.
- कारण साळोबा सगळ्यात लहान होता.
आ) दहीहंडीत बोकोबा मांजर सर्वात खाली उभे राहिले.
- कारण बोकोबा सर्वात मोठा होता.
४) तर काय झाले असते ते सांग.
अ) आजीबाईंनी लोणी उंचावर ठेवताना माजरांनीपहिले नसते, तर मांजरांनी दहीहंडी केली नसती.
आ) आजी थोड्या उशिराने घरी आली असती,तर आजीला मांजराची दहीहंडी दिसली नसती.
५) आईने उंचावर ठेवलेला खाऊ मिळण्यासाठी तू काय काय करशील ते सांग.
- मी खुर्ची पायाखाली धरीन किंवा मी माझ्या मोठ्या भावाच्या खांद्यावर बसेन.
६) खूप हा शब्द दोन वेळा वापरून खूप खूप असा शब्द त्त्यार झाला. तसे आणखी कोण कोणते शब्द दोन वेळा वापरता येतील, ते वापरून तुझे शब्द लिहा.
- दूर दूर, जवळ जवळ, भर भर, सळसळ, मळमळ, वळवळ,सरसर, खसखस, बडबड, घरघर.
७) अक्षरांच्या योग्य क्रम लाऊन अर्थपूर्ण शब्द तयार कर.
अ) जी आ = आजी
आ) र मां ज = मांजर
इ) र शा हु = हुशार
ई) डी हि हं द = दहीहंडी
1 टिप्पण्या
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा