कणभर तीळ स्वाध्याय
इयत्ता-दुसरी
१. कोण ते लिही.
अ) तिळाला पाहून हसणारे – वाटणा, फुटाणा, शेंगदाणा
आ) तिळाच्या बरोबर - वाटणा, फुटाणा, शेंगदाणा
इ) हलवा करणारी – ताई
२. का ते लिही.
अ) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाला हसू लागले, कारण तीळ कोठेही न थांबता भरभर चालला होता.
आ) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा हे तिळाबरोबर निघाले, कारण त्यांना
तिळाची गंमत बघायची होती व जंमत करायची होती.
इ) ताई रुसून बसली, कारण हलवा करायला घरात तीळ नाही.
ई) वाटणा, फुटाणा, शेंगदाणा घाबरून गेले, कारण त्यांनी रसरसून
शेगडी पेटलेली बघितली.
३. असे कोण म्हणाले?
अ) तिळा, तिळा कसली रे गडबड असे वाटणा, फुटाणा, शेंगदाणा म्हणाले.
आ) काम आहे मोठं, मला नाही सवड असे तीळ म्हणाला.
४. दिलेल्या शब्दांवरून प्रश्न तयार कर.
१) सोनाली – हुशार
अ) सोनाली कशी आहे?
आ) हुशार कोण आहे?
२) खुर्ची - लहान
अ)लहान काय आहे?
आ) खुर्ची कशी आहे?
३) दूध – गरम
अ) दूध कसे आहे?
आ) गरम काय आहे?
४) बर्फ – थंड
अ) बर्फ कसे आहे?
आ) थंड काय आहे?
५) शर्ट – रंगीत
अ) शर्ट कसे आहे?
आ) रंगीत काय आहे?
६) लोखंड – जड
अ) लोखंड कसे आहे?
आ) जड काय आहे?
७) कापूस – हलका
अ) कापूस कसा आहे?
आ) हलका काय आहे?
८) गूळ – गोड
अ) गूळ कसा आहे?
आ) गोड काय आहे?
९) मीठ – खारट
अ) मीठ कसे आहे?
आ) खारट काय आहे?
१०) फूल – सुगंधी
अ) फूल कसे आहे?
आ) सुगंधी काय आहे?
0 टिप्पण्या