शिष्यवृत्ती परीक्षा 2021
परिक्षेबाबत महत्वाची सूचना मे 2021
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८ वी)ही दिनांक 23 मे 2021 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे, हे पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यास प्राधान्य देऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक परिषदेमार्फत यथावकाश प्रसिद्ध केले जाईल.
म्हणजेच 23 मे 2021 रोजी होणारी इयत्ता पाचवी व आठवी ची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या या परीक्षेबाबत कोणतेही तारीख प्रसिद्ध करणेत आलेली नाही. परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध होता आपल्याला परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर वर पाहता येईल.
0 टिप्पण्या