YCMOU Preparatory exam 2022 | पूर्वतयारी परीक्षा माहिती

पूर्वतयारी परीक्षा

YCMOU Preparatory exam 2022

YCMOU Preparatory exam


                    ज्या विद्यार्थ्यांना दररोज महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता देत नाही; तसेच  अभ्यासाकरिता पूर्णवेळ देता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्वतंत्र अध्ययन पद्धती विकसित केली आहे.विद्यार्थ्यांना आपले काम पाहत शिक्षण पूर्ण करता येते.
                  त्याचबरोबर ज्यांंना बारावीपर्यंतच शिक्षण घेता आलेे नाही आशा विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करता यावे  यासाठी पूर्वतयारी परीक्षा (YCMOU Preparatory exam) या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्याद्वारे पूर्वतयारी परीक्षा घेतली आहे. ज्यांना काही कारणास्तव बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता आले नाही आणि ज्यांना आता उच्च शिक्षण घ्यायचे आहे, अशा लोकांसाठी ही परीक्षा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम, पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकेल. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचे आठवी, दहावी, अकरावी किंवा बारावी नापास एवढे शिक्षण झाले आहे आहे तेही विद्यार्थी YCMOU Preparatory exam  उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात.

या चाचणीबद्दल अधिक माहिती ....

     

     प्रवेश पात्रता | ycmou preparatory exam admission Eligibility Criteria

             १) परीक्षा देण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
             २) उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषांचे वाचन-लेखन येणे आवश्यक आहे. 
या दोनही  पात्रता पूर्ण करणारा कोणीही व्यक्ती पूर्व परीक्षा देऊ शकतो.

       प्रवेश शुल्क व कालावधी | ycmou preparatory exam fees

  • पुर्वतयारी परीक्षेसाठी एकूण शुल्क ७५० रुपये आहे.
  • शुल्क विद्यापीठाने निर्धारित केलेल्या पद्धतीने भरावे. 
  
                 नोंदणी  कालावधी प्रवेश घेतल्यापासून 2 वर्षांचा असेल. या कालावधीत उमेदवार जास्तीत जास्त 4 परीक्षा देऊ शकेल.दोन वर्षात पूर्वतयारी परीक्षा यशस्वीपणे पूर्ण नाही केल्यास पुन्हा नोंदणी करावी लागेल.

          परीक्षा मध्यम| ycmou preparatory exam mediums

  •  परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून दिली जाऊ शकते.

           मूल्यमापन प्रक्रिया  ycmou preparatory exam Evaluation process

  •  १०० गुणांची अंतिम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येते.

  • यात ५० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न व ५० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न असतात.

  •  परीक्षेचा कालावधी ३ तासांचा आसेल. 

  •  परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहेत.

  • विद्यार्थ्याने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येईल.

नोंदणी प्रक्रिया | ycmou preparatory exam admision Process

       या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल.

  • पूर्वतयारी परीक्षा माहिती पुस्तकाचा बारकाईने अभ्यास करावा व खालील कागदपत्राची स्कॅन कॉपी प्रवेशाच्या वेळी सोबत ठेवावी.
  • जन्मतारखेचा दाखला (यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट इत्यादी.)
  • पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र 
  • मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास जातीचा दाखला
  • विद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र.
  • चालू स्थितीत असलेला मोबाईल नंबर व वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • विद्यापीठ शुल्क भरण्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग यापैकी एक.
  • वरील सर्व माहिती जमा केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने आपल्याला अर्ज भरता येईल. अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्रे अपलोड करावी व परीक्षा फी भरल्यानंतर आपला प्रवेश निश्चित होईल.

           अशा प्रकारे आपल्याला पूर्वतयारी परीक्षा देता येईल. ऑनलाईन नोंदणी करताना अथवा परीक्षा 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या