YCMOU Exam may 2021
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत ज्या विद्यार्थ्यांना नियमितपणे विद्यालयात जाऊन शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा या रद्द करण्यात आल्या अथवा ऑनलाईन घेण्यात आल्या. दरवर्षी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या डिसेंबर महिन्यातील परीक्षा या कोरोनामुळे प्रलंबित होत्या. या प्रलंबित असणाऱ्या परीक्षा विद्यापीठामार्फत 3 मे पासून घेण्यात येणार आहेत आणि या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
ऑनलाइन परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.
- डिसेंबर 2020 च्या प्रलंबित परीक्षा विद्यापीठाने मे 2021 मध्ये ऑनलाईन पद्धतीने आयोजित केल्या आहेत. त्याचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावे लागेल. प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील शिक्षणक्रमाच्या परीक्षा होणार आहेत उर्वरित शिक्षणक्रमाच्या परीक्षा होणार नाहीत.
- परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ब्राउझर लिंक ( https://ycmou.unionline.in ) दिली आहे. ती लिंक ओपन करून परीक्षा प्रणालीत प्रवेश करायचा आहे.
- परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठी डेमो परीक्षा याच लिंकवर उपलब्ध असेल. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी या लिंक वरील डेमो परीक्षा सोडवून सराव करावा. म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा देताना अडचणी येणार नाहीत.
- ऑनलाइन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यास परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल.नोंदणी करताना त्यास प्रथम कायम नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.त्यानंतर त्याचे नाव स्क्रीनवर दिसेल त्याचे नाव कायम नोंदणी क्रमांक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःची जन्मतारीख टाकावी. प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षेचा साठ मिनिटाचा कालावधी सुरु होईल.
- वेळापत्रकानुसार परीक्षा दोन सेशनमध्ये सकाळी 8 ते 1 व दुपारी 3 ते 8 या वेळेत होईल. सकाळी 8 ते 1 व दुपारी 3 ते 8 हे लॉगीनस्लॉट टाइमिंग असेल.
- ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न असलेली परीक्षा असेल. प्रत्यक्ष परीक्षेचा 60 मिनिटे वेळ असेल. लॉगीनस्लॉट टाइम 5 तासांचा असला तरी प्रत्यक्ष परीक्षा ही 60 मिनिटाची असेल. त्या कालावधीत परीक्षा संपवणे आवश्यक राहील विद्यार्थ्याने परीक्षेला उपलब्ध 50 प्रश्न पैकी 30 प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे साठ गुणांची परीक्षा होईल आणि साठगुणांचे रूपांतर 80 गुणात करण्यात येईल.
- विद्यार्थ्याने परीक्षा सुरू केल्तया नंर कुठल्याही तांत्रिक कारणाने Logout झाल्यास विद्यार्थ्याला वेळापत्रकानुसार दिलेल्या लोगिन टाइम मध्ये पुन्हा लॉगीन करता येईल व त्याचा शिल्लक वेळ मिळेल. म्हणजेच सुरुवातीला त्याने दहा मिनिट वेळ वापरला असेल व दहा मिनिटात 5 प्रश्न सोडवले असतील तर उर्वरित पन्नास मिनिट त्याला पुढील प्रश्न सोडवण्यासाठी मिळतील.
- विद्यार्थ्यांना त्यांची कुठल्याही विषयाची परीक्षा होणार आहे यासाठी या इव्हेंटला त्यांची परीक्षा होणार आहे त्यांची यादी विद्यापीठाच्या पोर्टलवर दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानुसारच्या विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांने द्यावी.
- परीक्षेच्या कालावधीत परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अभ्यास केंद्राने प्रति सत्र एका व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्याशी संबंधित अभ्यास केंद्रावरून घ्यावा आणि परीक्षेविषयी अडचणी असल्यास त्या व्यक्तीशी संपर्क साधावा.
- ऑनलाइन परीक्षेसंदर्भातील शंका निरसनासाठी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर परीक्षा कालावधीत मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
परीक्षेपूर्वी सर्वात अगोदर आपणाला आपल्या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक डाउनलोड करायचे आहे. हे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी आपण विद्यापीठाच्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता किंवा खालील लिंक वर क्लिक करून विद्यापीठाच्या वेळापत्रक पेजवर जाऊ शकता.
वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
वेळापत्रक डाउनलोड केल्यानंतर आपला कोणता पेपर कोणत्या दिवशी आहे व आपल्या पेपरचे लॉगिन स्लॉट टाईम काय आहे याची माहिती घ्या. कारण पाच तासाच्या आपल्याला उपलब्ध असलेल्या लॉगन स्लॉटमध्ये आपल्याला लॉगिन करून ही परीक्षा द्यायची आहे. या वेळा व्यतिरिक्त आपल्याला लॉगीन करता येणार नाही. स्लॉट टाईम पाहिल्यानंतर परीक्षा दिवशी शक्यतो स्लॉट टाईमच्या सुरुवातीलाच लॉगीन करण्याचा प्रयत्न करा. स्लॉट टाईम संपत येताना लॉगीन करण्याचा प्रयत्न केल्यास तांत्रिक अडचण येऊ शकते. लॉग इन केल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे आपण Logout झाल्यास दिलेल्या स्लॉट टाईम मध्ये आपल्याला पुन्हा लॉगीन करता येईल. पुन्हा लगीन केल्यानंतर आपण पूर्वी वापरलेला वेळ वजा करून उर्वरित वेळात आपल्याला उर्वरित प्रश्न सोडवावे लागतील.स्लॉट टाईम संपल्यानंतर मात्र आपल्याला लॉगीन करता येणार नाही. सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्यामुळे आपल्याला फक्त पर्याय सिलेक्ट करायचा आहे याबाबतची डेमो परीक्षा आपल्याला संकेत स्थळावर देता येईल.
परीक्षेसाठी आवश्यक साहित्य
- परीक्षेसाठी आपणाकडे फ्रंट कॅमेरा असलेला लॅपटॉप, कम्प्युटर अथवा मोबाईल असणे आवश्यक आहे.
- त्याच बरोबर चांगल्या स्पीड चे इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.
- आपला PRN नंबर व जन्मतारीख.
- मोबाईल, laptop फुल चार्ज असावा.
0 टिप्पण्या