marathi mhani v tyancha arth | म्हणी व त्यांचा अर्थ

मराठी म्हणी व त्यांचा अर्थ

मराठी म्हणी व अर्थ
                    महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते. पूर्वी ग्रामीण व शहरीभागात म्हणींचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होत होता.मात्र अलीकडच्या काळात या म्हणीचा वापर कमी होताना दिसतो. बऱ्याच जणांना या म्हणींचा अर्थ माहित नासातो म्हणून त्यांचा वापर केला जात नाही. मराठी भाषेमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख म्हणी व त्यांचा अर्थ या लेखात आपण पाहणार आहोत.
    1. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. 
    2. ओठात एक आणि पोटात एक-  बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे.
    3. अंगापेक्षा  भोंगा मोठा-  कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व येणे.
    4. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारट - मनुष्य स्वतः संबंधी जी उदार बुद्धी ठेवतो ती दुसऱ्या  संबंधी ठेवत नाही.
    5. अडला हरी गाढवाचे पाय धरी-  शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.
    6. आवळा देऊन कोहळा काढणे-  क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात  मोठा लाभ करून घेणे.
    7. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास -  आधीच इच्छा नसताना आणखी नकारार्थी  घटना घडणे.
    8. आयत्या बिळावर नागोबा -  दुसऱ्याच्या श्रमाचा आयता फायदा घेणे.
    9. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी -  गरज एकीकडे  मदत दुसरीकडे.
    10. अति शहाणा त्याचा बैल रिकामा -  स्वतःला  अति शहाणा समजणाऱ्या कडून काहीच काम होत नाही.
    11. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी -  स्वतः संकट ओढवून आलेली नाचक्की टाळण्यासाठी भलत्याच गोष्टीचे निमित्त करणे.
    12. आंधळे दळते नि कुत्र  पीठ खाते -    एखाद्च्याया कष्टाचा दुसऱ्याने फायदा घेणे.
    13. अडली गाय  फटके खाय -  अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात.
    14. आपलेच दात आपलेच ओठ -  नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे अवघड होते.
    15. अंथरूण पाहून पाय पसरणे -  ऐपतीच्या मानाने खर्च करावा.
    16. आधी पोटोबा मग विठोबा -  आधी स्वार्थ मग परमार्थ.
    17. कुत्र्याचे शेपूट नळीत घालून ठेवले तरी ते वाकडेच -  एखाद्याचा मूळ स्वभाव बदलत नाही.
    18. कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणस क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीने ही संतुष्ट होतात
    19. काकडीची चोरी फाशीची  शिक्षा - लहान अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
    20. कोंड्याचा मांडा करुन खाणे -  गरिबीच्या  परिस्थितीतही आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे.
    21. कडू कारले तुपात  तळलं, साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - एखाद्या व्यक्तीचा काही केले तरी त्याचा मूळ स्वभाव न बदलणे.
    22. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही.
    23. कोंबडे झाकले म्हणून  तांबडे फुटायचे राहत नाही -  नियमित आणि  निश्चित  घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
    24. काखेत कळसा नि गावाला वळसा -  हरवलेली वस्तू जवळ असताना इतरत्र शोधणे.
    25. कानामागून आली आणि तिखट झाली -  मागून येऊन प्रसिद्ध होणे.
    26. कामा पुरता मामा ताकापुरती आजी -   स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस.
    27. करावे तसे भरावे -  वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.  
    28.  कोळसा उघळावा,  तितका काळाच -  दृष्ट माणसाबाबत अधिक विचार केला असता  त्यांच्या अधिकाधिक दुष्कृत्ये  उजेडात येतात.
    29. कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे.
    30. काळ आला होता पण वेळ आली नव्हती -  एखादे अनिष्ट संकट येऊनही त्यातून सहीसलामत सुटणे.
    31. कर नाही त्याला डर कशाला -  ज्याच्याकडून काही वाईट घडलेले नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही.
    32. कोरड्याबरोबर  ओलेही जळते -  अपराध्या बरोबर निरपराधी माणूसही  सुळावर चढला जातो.
    33. कळीवर नारळी अन घर चंद्रमोळी -  अत्यंत गरीब अवस्था असणे.
    34. काप गेले आणि भोके राहिली -  भरभराटीचे दिवस जाऊन वैभवाच्या खुणा तेवढ्या राहणे.
    35. खायला कार भुईला भार - निरोद्योगी मनुष्य  सर्वांना भार होतो.
    36. खाल्ल्या घरचे वास मोजणे - उपकारकर्त्याला विसरणे.
    37. गाढवाला गुळाची चव काय - मूर्खाला चांगल्या वस्तूचे मोल   कळत नाही.
    38. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली -  एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे.
    39. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला  किती उपदेश केला तरी त्याचा काहीही   उपयोग होत नाही.
    40. गाढवाला दिला मान नि त्याने केले उंच कान - मूर्ख माणसाला आदर दिला की तो शेफारून जातो.
    41. गाव करी ते राव न करी -  जे कार्य सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर करू शकत नाही.
    42. गरजवंताला अक्कल नसते -  गरजू व्यक्ती प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी  लागते.
    43. गर्वाचे घर खाली -   गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव स्वीकारावा लागतो.
    44. गर्जेल तो पडेल काय? - केवळ बडबड करणाऱ्या कडून कोणतेही काम होत नाही.
    45. गरज सरो वैद्य मरो -  आपला फायदा होता उपकार कर्त्याला  विसरणे.
    46. उतावळा नवरा अन गुडघ्याला बाशिंग -  उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
    47. घर फिरले की घराचे वासेही फिरतात -  घरातील मुख्य माणसावर संकट आले की त्याचे आश्रित देखील त्याच्यावर उलटतात.
    48. घर ना दार देवळी बिऱ्हाड - सडाफटिंग असणे.
    49. चालत्या गाडीला खीळ घालणे -  सुरळीत  चाललेल्या कामात व्यत्यय आणणे .
    50. चोरावर मोर -  एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून माफ करणे.
    51. चोराच्या मनात चांदणे -  जो दुष्कृत्ये  करतो त्याला मनात धास्ती वाटते.
    52.  खाल्ल्या घरचे वास मोजणे - उपकारकर्त्याला विसरणे.
    53.  गाढवाला गुळाची चव काय - मूर्खाला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही.
    54. जिथे राबती हात तेथे हरीचा वास - जिथे श्रम केले जातात तेथे देवाचा वास असतो.
    55. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसऱ्याच्या अडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाही.
    56. जशी देणावळ तशी धुणावळ - जशी मजुरी दिली जाते त्याच प्रमाणे काम होणार.
    57. जी खोड बाळा ती जन्मकळा - लहानपणी जडलेल्या सवयी जन्मभर राहतात.
    58. जे न देखे रवी ते ते देखे कवि - कल्पनाशक्तीच्या बळावर कवी वास्तवाच्या पलीकडे पाहू शकतो.
    59. जात्यावर बसले की ओवी सुचते - एखाद्या कार्याची सुरुवात केली की आपोआप मार्ग सुचतो.
    60. झाकली मुठ सव्वा लाखाची - दोष उघड न होणे चांगले.
    61. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही-भरपूर कष्टावाचून मोठेपण मिळत नाही.
    62. डोळ्यात केर कानात फुंकर-   गरज एकीकडे मदत दुसरीकडे.
    63. तेरड्याचा रंग तीन दिवस - अल्पकाळ टिकणारे सुख.
    64. ताटाखालचे मांजर असणे - दुसऱ्याच्या पूर्ण आधीन असणे.
    65. थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे साठवत राहिल्याने काही काळात त्याचा मोठा साठा तयार होतो.
    66. दाम करी काम- पैशाच्या साह्याने सर्व बाबी साध्य होणे.
    67. दुरून डोंगर साजरे - दोन दिसणाऱ्या चांगल्या गोष्टींचे सर्व स्वरूप जवळून कळून येते.
    68. दोघांचेभांडण तिसऱ्याचा लाभ - भांडण करणाऱ्यांचा  काहीही फायदा न होता त्यातून तिसर्‍याचाच फायदा होणे.
    69. देश तसा वेश - परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वर्तन करणे.
    70. धर्माची डाळ अन पाखडून घाल - लाचारीचे जीवन जगत असतानाही मिजासखोरपणा दाखविणे.

    71. पाण्यात राहून माशाशी वैर - ज्या ठिकाणी राहायचे  तेथील माणसांशीच  वैर धरणे .

    72. पी हळद अन् हो गोरी -  उतावळेपणा दाखविणे.

    73. पाण्यात पडलं की पोहता येते - एखाद्या कार्याची सुरुवात केली की आपोआप मार्ग सुचतो.

    74. प्रसंग पडे तर गाढवाला म्हणे काका - शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते.

    75. पालथ्या घड्यावर पाणी - मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही.

    76. नाक दाबले की तोंड उघडते - मर्मावर आघात केल्याशिवाय घटनेवर येत नाही.

    77. नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे  - केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे.

    78. नवी विटी नवे राज्य -  सर्वच  प्रकार नव्याने सुरु करणे.

    79. नाव मोठे लक्षण खोटे - भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक ढोंगीपणाची. 


    1. marathi mhani pdf



अलंकारिक शब्द

वाक्प्रचार अर्थ व वाक्यात उपयोग 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या