Scholarship Exam date 2021
शिष्यवृत्ती परीक्षा 2021 कधी होणार?
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत केले जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यानुसार सन 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या बदलाबाबत प्रसिद्धी देण्यात आली आहे. सदरचे पत्र 30 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेे. हे पत्र परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर आपण पाहू शकता व डाऊनलोड करू शकता www.mscepune.in तसेच या खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करून घेऊ शकता. प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्यासाठी इथे click करा.
या प्रसिद्धी पत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी व आठवी यांची 25 एप्रिल 2021 रोजी होणारी परीक्षा या दिवशी रद्द करण्यात आली असून ही परीक्षा या नवीन पत्रानुसार दिनांक 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार आहेे. ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजेे 23 मे 2021 रोजी घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखे मध्ये बदल करून त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
त्याच बरोबर ज्या विद्यार्थ्यांना 30 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचेे ऑनलाईन आवेदन पत्र भरता आले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी परिषद परिषदेमार्फत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 10 एप्रिल 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप आवेदनपत्र भरले नाही त्यांनी या मुदतीत आवेदनपत्र भरावेत.
या मुदत वाढीमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ज्यादाचा वेळ परीक्षा पुढेे ढकलल्यामुळे मिळेल. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करता येईल.
0 टिप्पण्या