Scholarship Exam 2021
इयत्ता 5 वी
पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) ही परीक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण यांच्या मार्फत घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये होते मात्र सन 2020-21 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ही परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची ओळख व्हावी व त्या दृष्टीने त्यांची तयारी व्हावी यासाठी घेतली जाते. Scholarship Exam ही इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते.
परीक्षेचे स्वरूप
- शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दोन पेपर असतात.
- पेपर 1 मध्ये प्रथम भाषा व गणित या विषयांचा समावेश होतो, तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता या विषयांचा समावेश होतो.
- पेपर एक मधील प्रथम भाषेकरिता 50 गुण व गणित विषयाला 100 गुण असतात.
- पेपर 2 मध्ये तृतीय भाषाकरिता पन्नास गुण व बुद्धिमत्ता या विषया करिता शंभर गुण असतात.
- दोन्ही पेपर मध्ये 75 प्रश्नांचा समावेश असतो व एक प्रश्न दोन गुणांना याप्रमाणे एक पेपर 150 गुणांचा असतो.
- सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतात. एका प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले असतात त्यातील एक उत्तर बरोबर व उर्वरित तीन उत्तरे चुकीची असतात.
- एक पेपर सोडवण्यासाठी एक तास तीस मिनिटांचा कालावधी असतो म्हणजेच 75 प्रश्न आपल्याला नव्वद मिनिटांमध्ये सोडवायचे असतात.
- दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात दोन पेपर मध्ये एक तासाचा वेळ असतो.
- प्रत्येक पेपर साठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
- शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये 30 % प्रश्न सोप्या स्वरूपाचे, 40% प्रश्न मध्यम काठिण्यपातळी असणारे व उर्वरित 30% प्रश्न कठीण स्वरूपाचे असतात.
शिष्यवृत्ती परीक्षा साठी आवश्यक पात्रता
- विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच त्याच्या पालकाचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
- विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित, विनाअनुदानित शाळेत इयत्ता पाचवी मध्ये शिकत असावा.
ऑनलाइन आवेदन पत्र भरण्याचे वेळापत्रक
- नियमित शुल्कासह दिनांक 19 मार्च 2021 ते 30 मार्च 2021 या कालावधीमध्ये ऑनलाइन आवेदन पत्र व शुल्क भरता येईल.
- शिष्यवृत्ती फॉर्म फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येतो.
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण विद्यार्थ्यांकरीता प्रवेश शुल्क 20 रुपये व परीक्षा शुल्क 60 रुपये असे एकूण 80 रुपये व मागास विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थी यांच्याकरिता परीक्षा प्रवेश शुल्क 20 रुपये परीक्षा शुल्क 0 रुपये असे एकूण 20 रुपये शुल्क आकारण्यात येते.
दिव्यांग व मागास विद्यार्थ्यांकरीता फक्त प्रवेश शुल्क आकारले जाते व परीक्षा शुल्क आकारले जात नाही.
परीक्षेचे माध्यम
परीक्षा एकूण आठ माध्यमांमध्ये घेतली जाते.
1.मराठी 2.उर्दू 3.हिंदी 4.गुजराती
5.इंग्रजी 6.हिंदी 7.तेलगू 8.कन्नड
यापैकी ज्या मध्यमामध्ये विद्यार्थी शिकत असेल त्या माध्यमामध्ये तो परीक्षा देऊ शकतो.
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थ्यांच्या फोटो व स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (100 kb पेक्षा जास्त साइज नसावी)
- विद्यार्थ्याचा student ID.
- विदर्भातील 11 जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20 हजार रुपयापेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकारी चे प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचे पालक रुपये वीस हजार पेक्षा कमी उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रुपये 20000 पेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
- संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.
- विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड.
- मुख्याध्यापकांना फॉर्म भरण्यासाठी शाळेचा शाळा सांकेतांक व पासवर्ड आवश्यक आहे.
0 टिप्पण्या